यंदा दुष्काळात ऊस मोडू नका! कमी पाण्यात ऊस जगवा आणि पुढील वर्षी मिळवा ₹९० हजार उत्पन्नाची संधी!
पाणी कमी आहे म्हणून ऊस मोडण्याची घाई करू नका! आजचा एक विचारपूर्वक निर्णय तुमचा पुढील वर्षीचा मोठा खर्च वाचवू शकतो आणि एकरी ₹90 हजार उत्पन्नाची संधी निर्माण करू शकतो. 1 . दुष्काळाचे संकट की पुढील वर्षाच्या कमाईची संधी ? शेतकरी मित्रांनो , यंदा अल निनोच्या संभाव्य परिणामांसह कमी पर्जन्यमानामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकरी सध्या उपलब्ध पाण्यात ऊस जगवणे शक्य नसल्याचा विचार करून यंदाच्या गाळप हंगामात ऊस कारखान्याला घालून उरलेला खोडवा मोडण्याचा निर्णय घेत आहेत. त्यानंतर जमिनीची मशागत करून पल्टी नांगरट करून जमीन उन्हाला तापविणे व पुढील पावसाळ्यात नवीन ऊस लागवड करण्याचा विचार आहे. परंतु , शेतकरी मित्रांनो , थोडा विचार करा! आज खोडवा ऊस मोडण्यासाठी साधारण ₹5,000 खर्च येऊ शकतो. त्यानंतर नवीन ऊस लागवडीसाठी बेणे , जमीन तयारी , लागवड आणि इतर कामांसाठी आणखी ₹25,000 ते ₹30,000 खर्च करावा लागू शकतो. म्हणजेच , आजचा खोडवा मोडून नवीन लागवड करण्याचा न...